बैलपोळा : ग्रामीण भागात सर्जा-राजा सज्ज

Foto
या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने आपल्या ढवळ्या-पवळ्याला सजविण्यासाठी झूल, रंगीबिरंगी गोंडे, घंट्यांच्या माळा आदी साहित्य खरेदीसाठी शेतकर्‍यांनी आज सकाळपासूनच बाजारात गर्दी केली. तसेच शहरात राहणार्‍या नागरिकांकडून मातीची बैलजोडी, बैल खरेदी करून घरोघरी आज महिलांनी पूजा करून बैलाची आणि बळीराजाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामीण भागात सर्जेराजाची मळणी करून घुंगरूची माळ, रंगरंगोटी करून शेतकरी बांधवांनी बैलजोडी पूजा करण्यासाठी सज्ज केली आहे.
दरवर्षी मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात येतो. त्यासाठी शहरातील हर्सूल परिसरासह शहरालगतच्या ग्रामीण भागात ठीक- ठिकाणी शेतकरी बैलांची मिरवणूक काढून बैलपोळा साजरा करण्यात येतो. घरोघरी देखील मातीच्या बैलांची पूजा करून बैलपोळा साजरा करण्यात येतो. काहीजण एकत्रितपणे बैलपोळा साजरा करतात. परंतु यंदा कोरोनाचे सावट पसरल्याने अनेकांनी मिरवणूक न काढता घरातच सर्जेराजाची पूजा करून बैलपोळा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज बैलपोळा सणाच्या निमित्ताने बैलांची सजावट करून संध्याकाळी अनेकजण पूजा करून बैलाची पूजा करणार आहे. तर अनेकांनी सकाळीच पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून पूजा करून बैलपोळा साजरा केला. आज बैलपोळानिमित्ताने घराघरात बैलपोळा सणाची धूम दिसून आली.